‘ज्या बूथवरून काँग्रेसला एकही मत मिळणार नाही, त्या बूथच्या अध्यक्षाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देणार’

Kailash Vijayvargiya – निवडणूक आयोगाने (Election Commission) काल पाच राज्यांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणमध्ये 7 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विविध टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील. या पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान,भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आपल्या मतदारसंघात फिरून मतदारांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, एका जनसभेला संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय यांनी असे काही बोलले, ज्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद द्या, असे म्हणताना ऐकू येत आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाला एक मतही देऊ नये. ज्या बूथवरून काँग्रेसला एकही मत मिळणार नाही, त्या बूथच्या अध्यक्षाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देणारअसल्याचे त्यांनी सांगितले.

कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट मिळणे हा चर्चेचा विषय बनला आहे. तिकीट मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा इंदूर-३ चे आमदार आकाश विजयवर्गीय यांचे तिकीट रद्द होऊ शकते, असे बोलले जात आहे. दरम्यान, आपल्या निवडणुकीच्या भवितव्यावर धुके असताना आकाशने पक्षाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या ताब्यातील इंदूर-१ या जागेवरून उमेदवारी केलेले त्यांचे वडील किमान एक लाख मतांनी निवडणूक जिंकतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया