कळंब येथे अवैध गुटखा विरोधी कारवाई;  ३,५५,२८०रुपयाचा गुटखा जप्त

तुळजापूर – धाराशिव जिल्हयातील, कळंब येथे  सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या आदेशावरुन पोलिसांनी सोमवार दि १०रोजी कळंब शहरात दोन ठिकाणी धाडी टाकुन ३,५५,२८०रुपयाचा गुटखा जप्त केला.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, कळंब शहरातील मदिना चौकातील शुभम किराणा स्टोअर्स व सावित्रिबाई फुले शाळेमागील एक गोदाम अशा तीन ठिकाणी काही इसम अवैध गुटखा बाळगुन आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली.  यावर पथकाने प्रथमतः मदिना चौक, कळंब येथील शुभम किराणा स्टोअर्स येथे छापा टाकला असता श्रीनिवास सत्यनारायण करवा हे विविध कंपनीचा गुटखा एकुण १९,०९० ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. तर सावित्रिबाई फुले शाळेमागे दोन ठिकाणी यात शुभम श्रीनिवास करवा एका ठिकाणी तसेच रुपेश विष्णुदास मालपाणी व मनोज झुबारलाल मालपाणी हे जवळज एका गुदामामध्ये विविध कंपनीचा गुटखा एकुण३,३६,१९० ₹ किंमतीचा असा एकुण ३,५५,२८० ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले.

यावरून पथकाने नमूद सर्व ठिकाणचा गुटखा जप्त केला आहे. श्रीनिवास करवा, शुभम करवा, मनोज मालपाणी व रुपेश मालपाणी या सर्वांनी संगनमत करून महाराष्ट्र
शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहित असतानाही जवळ बाळगलेले मिळुन आल्याने पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा क्र. १३ / २०२३ हा भा.दं.सं. कलम ३२८, २७२, २७३, ३४ अंतर्गत दि. १०.०१.२०२३ रोजी नोंदवला आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि-  पुजारवाड, श्रीमती साबळे, पोलीस अंमलदार – अंभोरे, मंदे, चव्हाण, शेख यांच्या पथकाने केली आहे