Porsche car Accident | …तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीचे जुने दुष्कृत्य आले समोर
पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Porsche car Accident ) यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
दरम्यान, सोनाली तनपुरे यांनी कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… असे लिहित आपल्या मुलासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असे सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Porsche Car Accident | मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पोलीस आयुक्तांना फोन
Vijay Wadettiwar | दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी करा
Ashish Shelar | महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं