प्राजक्ता माळीला सलमान खानसोबत करायचंय लग्न? मराठी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

मुंबई- प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने मराठी अभिनेता वैभव तत्ववादी तिला आवडायचा असे तिने सांगितले होते. ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमापासून वैभव तत्ववादीवर तिचा क्रश होता. परंतु नंतर त्यांनी एका चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आणि त्यांच्यात मैत्री झाली. आता वैभव तिचा क्रश राहिला नाही असंही तिने सांगितलं होतं. यानंतर आता प्राजक्ताने तिला बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबद्दल (Salman Khan) केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

प्राजक्ता शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतीच ती एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिला सलमान खान खूप आवडायचा असं सांगितलं. (Prajakta Mali Wants To Marry Salman Khan)

तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण?, याचा खुलासा करताना ती म्हणाली, “मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते…दोन-तीन वर्षांची. माझ्या आतेभावाचा तो खूप आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खानशी लग्न करायचं.” हे उत्तर देताना प्राजक्तालाही ते जुने दिवस आठवून हसू आलं.