लग्न न करताच गरोदर झाली बॉलीवूड अभिनेत्री, वयाच्या ३७व्या वर्षी इलियाना डीक्रुझने दिली ‘गुड न्यूज’

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana Dcruz) हिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या इलियाना डिक्रूजने सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर करताना सांगितले आहे की, ती लवकरच आई होणार आहे. परंतु 37 वर्षीय इलियाना डिक्रूझचे अद्याप लग्न झालेले नाही, ज्यामुळे होणाऱ्या बाळाचे वडील कोण आहेत? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.

इलियाना डिक्रूझने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे प्रेग्नेंसीची (Ileana Dcruz Pregnancy) घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.  तिने ‘And so the adventure begins’ लिहिलेले एक बेबी रोमपर आणि ‘लवकरच येत आहे, माझ्या प्रिये, तुला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.’ या कॅप्शनसह ‘मामा’ पेंडंटचा फोटो शेअर केला आहे. इलियानाच्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर, जिथे तिचे चाहते तिचे जोरदार अभिनंदन करत आहेत, तिथे सोशल मीडियावर काही लोक हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत की या न जन्मलेल्या मुलाचा बाप कोण आहे? इलियानाने आपल्या भावी बाळाच्या वडिलांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

अलीकडेच अशी बातमी आली होती की, इलियाना डिक्रूझ बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. कॉफी विथ करण सीझन 7 च्या एका एपिसोडमध्ये करण जोहरनेही त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. दोघेही फॅमिली व्हेकेशनमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. मात्र अभिनेत्रीने आतापर्यंत या नात्याला दुजोरा दिलेला नाही.