पाकिस्तानमधील लोकांना जेव्हाही मी भेटतो तेव्हा ते माझं खूप प्रेमाने स्वागत करतात – बोमन इराणी

मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते बोमन इराणी (Boman Irani)  यांनी पाकिस्तानी चाहत्यांच्या बाबत केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोमन यांना चित्रपट प्रेक्षकांना कशाप्रकारे एकत्र आणतो? याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.

ते म्हणाले, एकता, प्रेम, आपुलकी, बंधुता हे चित्रपटांचे मध्यवर्ती विषय असतात, म्हणूनच चित्रपट लोकांना एकत्र आणतो. याव्यतिरिक्त दुसरी एखादी गोष्ट जी लोकांना एकत्रित आणू शकते याबाबत मला माहित नाही. पण संपूर्ण बॉलिवूड पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहे.इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचा उल्लेख करत बोमन म्हणाले, “जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या पाकिस्तानमधील लोकांना जेव्हाही मी भेटतो तेव्हा ते माझं खूप प्रेमाने स्वागत करतात. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य येतं.” प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम, खासकरून पाकिस्तानी प्रेक्षकांचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून बोमन भारावून जातात. या साऱ्या गोष्टी एकत्र आणल्या की नकारात्मकता आपसुकच दूर होते. त्यांच्याकडून मिळणारा आदर, त्यांचा दयाळूपणा मला भारावून टाकतो.