Praniti shinde | भाजपने फसविल्यामुळे जनतेचे हाल, काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा

Praniti shinde | आज अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिप गटातील गावात गावभेट दौऱ्याचा प्रथम दिवशी हैद्रा, उडगी, कलप्पावाडी, सातनदुधनी, तळेवाड, बबलाद, आंदेवाडी, सिन्नुर, दुधनी तांडा, मुगळी, इब्राहीमपुर, नागौर, मिरजगी, बोरी उमरगे, हत्तीकणबस, चिक्केहळी, स्लगर या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि मौजे सलगर येथे शेवटी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महागाई, रोजगार, महिलांवरील अत्याचार, पीक विमा, दुधाला दर, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे. भाजपने फसविल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाडा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केला आहे, भाजपला धडा शिकविण्यासाठी ७ मे रोजी काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी केले.

तर या सभेत माजी मंत्री सिध्दारामजी म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बक्कानुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

या गावभेट दौरा आणि जाहिर सभेस शिवसेना ठाकरे गट ता प्रमुख आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे बंदेनवाज कोरबु, काँग्रेस ता अध्यक्ष शंकर म्हेत्रें, काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाकभाई बळोरगी, जेष्ठ नेते मल्लीकार्जुन काटगाव, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, सलगरचे सरपंच ज्योतीताई डोगंराजे, महिला काँग्रेस ता अध्यक्षा शितलताई म्हेत्रे, माया जाधव, सुरेखा पाटील, सलगर माजी सरपंच सुरेखाताई गुडंरगी, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, शिवानंद बिराजदार, यु ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, सातलिंग गुडंरगी, युवा नेते प्रविण शटगार, उपसरपंच काशिनाथ कुंभार, संजय डोंगराजे, इक्बाल बिराजदार, इरणा धसाडे, महादेव चूंगी, अर्जुन जमादार, सातलिंग शटगार, गुरूनाथ कालीबत्ते, रफिक पटेल, रमेश डोंगराजे, अरविंद म्हेत्रे, संदिप फुलारी, सलगर गावासह पंचक्रोशीतील माता भगिनीसह नागरिक बाधंव मोठ्या बहुसंख्येत उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल