तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं; प्रवीण दरेकर याचं ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटासह भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपाचा एककलमी कार्यक्रम असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानंतर आता भाजपाने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं असं म्हणत निशाणा साधला आहे.

इतक्या खालच्या दर्जाची टीका मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीवर करणे चुकीचं आहे. शिंदे (CM Eknatah Shinde) आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काम करू द्या. दोन महिने झाले नाहीत तर एवढा पोटशूळ उठण्याचं कारण नाही. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेने पाहिलं आहे. अशा शब्दांमध्ये दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.