निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला CAA ची आठवण, नेहमीप्रमाणे CAA हाही ‘चुनावी जुमलाच’

Ramesh Chennithala : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एसी. सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, एसी. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबीरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, नामदेव उसेंडी, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, निवडणुक आली की भारतीय जनता पक्ष अशी जुमलेबाजी करत असतो. हे विधेयक मंजूर होऊन काही वर्ष झाले, या वर्षभरात त्यांना ते लागू करावे असे का वाटले नाही, आताच का ते CAA ची चर्चा करत आहेत. कारण त्यांना निवडणुकीत धार्मिक मुद्दा चर्चेत आणायचा आहे. CAA ला भाजापाशासित काही राज्यांचाही विरोध आहे, त्यामुळे CAA हा केवळ ‘चुनावी जुमला’ आहे, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

हिंदूंचे सरकार असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ कशी येते?

राज्यात काही संघटना हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहेत यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हिंदूंचे सरकार आले असे भाजपाचेच लोक जाहीरपणे सांगत असतात. दिल्लीत व राज्यातही हिंदूंचेच सरकार आहे मग हिंदू समाजाला आक्रोश मोर्चा का काढावा लागत आहे. या सरकारने महागाई, बेरोजगारी वाढवून हिंदूंचे नुकसान केले आहे. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य भाजपा सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली भाजपाने जे राजकारण केले त्यावर शंकरार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. खरे साधू संत हे भाजपाच्या विरोधातच आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी