‘जोशीची बायको पॉर्नस्टारसारखी दिसते’, सोसायटीच्या 140 सदस्यांना मेल, पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात (Pune Crime News) कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवण्यात आला आहे. कोंढवा (Kondhwa Crime) भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणत विनयभंग करण्यात आला. महिलेच्या नावाने मेल गेल्याचे महिलेला कळाल्यानंतर या प्रकरणी महिलेने तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सोसायटी मध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून ” जोशी ची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते, पॉर्न ऍक्ट्रेस आली नाही का चालायला” अशी अश्लील शेरेबाजी असलेला मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी याबद्दल जाब विचारण्यास गेला असता फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की करून तुला पोलिसात जायचे तर जा पण मी बघून घेतो काय करायचे ते, अशी धमकी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार महिलेच्या पतीसह झालेल्या वादानंतर आरोपीने बदला घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या संदर्भात सोसायटीतील सदस्यांशी देखील बातचीत करणार आहे.