एका अतूट नात्याचा सोहळा, पुण्यातील समलिंगी जोडप्याचे २० वर्षांचे नाते साजरे

पुणे शहरातील केशवबाग फार्म्स येथे शनिवारी समीर समुद्र आणि अमित गोखले या समलिंगी जोडप्याचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम होता. पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे समीरने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

पेनसिल्वानिया राज्यात पिट्सबर्ग शहरात तिथल्या कायद्यानुसार दोघेही एकमेकांशी विवाहबद्ध झाले आहेत, मात्र त्यावेळी दोघांचे पालक आणि नातेवाईक उपस्थित राहू शकले नव्हते. सगळ्यांना एकत्र बोलवण्याचा हेतू होताच, पण त्याहून अधिक महत्त्वाचे काही या सोहळ्यामागे होते.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांसंदर्भातील निकाल दिला. या विवाहांना परवानगी देता येणार नाही, कारण तसा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, न्यायालयाला नाही असे घटनापीठाने म्हटले होते. याप्रकरणी जे अनेक याचिकादार होते, त्यात समीर आणि अमित यांचाही सामावेश होता. या निकालामुळे दोघेही खट्टू झाले खरे, पण समलिंगी विवाह कायद्याने संमत नसतील तरी समलिंगी संबंधांना संरक्षण आहे आणि एलजीबीटीक्यू समुदायातील एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या कोणीही व्यक्ती या नात्याचे सेलिबेशन करू शकतात, असा विचार त्यांनी केला. आणि हाच या सोहळ्यामागचा मुख्य हेतू होता.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार