शिरूरचे पुढील खासदार शिवाजी आढळराव पाटीलच असणार; संजय राऊतांचा दावा 

पुणे – शिवसेना (Shiv Sena)  खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज क्रिकेटच्या मैदानात देखील फटकेबाजी केली. मी कधीच थर्ड अंपायर (Third Umpire) होणार नाही. मला उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली आत्ताच्या विरोधकांसमोर क्रिकेटचा सामना (Cricket Match) खेळायला आवडेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुण्यातील आंबेगाव येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आयोजित केलेले क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी संजय राऊत आज आंबेगावात आले होते. येथे त्यांनी प्रथम माध्यामांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण केले आणि क्रिकेटच्या मैदानातही विरोधकांवर निशाणा साधत चांगलीच फटकेबाजी केली.

शिरूरचे (Shirur)  माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत (Parliament) दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार (NCP MP Amol Kolhe) आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे (MVA) घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊत यांनी पुढे म्हटलं की, शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आढळरावांनी शिरूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, असंही राऊत यावेळी म्हणाले.