“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा

Actress Surabhi Bhave: मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सुरभी भावे हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण गुपिते सांगितली आहेत. तिची छेड काढणाऱ्या चार जणांना तिने आतापर्यंत चोप दिला असल्याचा खुलासा केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करून तिच्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

सुरभी म्हणाली, “मी मुळची कोकणातली आहे. गुहागरची. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्ये झालं. पण माझ्या आयुष्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमुळे कलाटणी मिळाली. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा आहे. या शाळेच्या पहिल्या बॅचची मी पास आऊट आहे.”

“त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. तिथे अभ्यासाबरोबरच स्विमिंग, योगा, रायफल शूटिंग, कराटे अशा गोष्टींचंही प्रशिक्षण मिळतं. तर त्याशिवाय तिथे सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं.” असं ती शेवटी म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा