रेल्वेने या प्लॅटफॉर्म तिकीट दर आणि गाड्यांचे भाडे वाढवले, संपूर्ण यादी पहा

नवी दिल्ली-  भारतीय रेल्वेने मकर संक्रांती सणादरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये ट्रेनच्या भाड्यात 20 ते 20.22 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, सिकंदराबाद, हैदराबाद, लिंगमपल्ली आणि बेगमपेट रेल्वे स्थानके आणि सिकंदराबाद विभागातील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर तात्पुरते वाढवण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले आहेत. रेल्वेने बहुतांश स्थानकांवर भाडे दुप्पट केले आहे, तर सिकंदराबाद स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत मूळ किमतीच्या पाच पटीने वाढवली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नवीन भाड्याची यादी  : सिकंदराबाद – ५० रु, हैदराबाद – 20 रु, वारंगळ – 20 रु, खम्मम – 20 रु, लिंगमपल्ली – 20 रु, काझीपेठ – 20 रु, मेहबूबाबाद – 20 रु, रामागुंडम – 20 रु, मंचिरियाल – 20 रु, भद्राचलम रोड – 20 रु, विकाराबाद – 20 रु, तंदूर – 20 रु, बिदर – 20 रु, परली वैजनाथ- 20 रु, पयेबेगमपेट – 20 रु