Pravin Darekar | मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, एसआयटीमार्फत चौकशी करा; प्रवीण दरेकरांची मागणी

Pravin Darekar On Manoj Jarange Patil: ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. अशातच भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगेंना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर मनोज जरांगेविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. यामुळे आता मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही