रवी राणांनी हनुमान चालिसा दाखवली, मुनगंटीवारांकडूनही चूक, शिवसेनेचा आक्षेप

Mumbai – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार  पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मुनगंटीवारांनी मतपत्रिका हातात दिल्याने काँग्रसेचे आमदार अमर राजूकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली. तर रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणं नियमांचे भंग आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही मते बाद करावीत अशी तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे.