आव्हाड, ठाकूर, कांदेंमुळे आघाडीचं गणित बिघडणार? निवडणूक आयोगानं मागवले व्हिडिओ

Mumbai – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार  पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मुनगंटीवारांनी मतपत्रिका हातात दिल्याने काँग्रसेचे आमदार अमर राजूकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.