शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण केला

अहमदनगर – अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरपोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे गावातील शेतकऱ्यांच्या घरांची वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली .

दरम्यान, या गावामध्ये 9 एप्रिल रोजी झालेल्या वादळ आणि पावसामुळे त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले होते. या घरांची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ग्रामस्थांना तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात घरे उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार अवघ्या काही तासात गावामध्ये पत्रे घेऊन ट्रक पोहोचले असून तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या घरांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण केला आहे.