आशिया खंडातील सर्वोत्तम खेळाडूला आयपीएलने नाकारलं! त्याच्या पत्नी ‘हे’ कारण सांगितलं

नवी दिल्ली : टाटा आयपीएल २०२२ मध्ये करोडो रूपयांची बोली लावून दहा संघाने खेळांडूची खरेदी केली आहे. यामध्ये अनेक खेळाडू करोडपती झाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळांडूवर बोली लागली नाही. यामध्ये आशिया खंडातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा देखील समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी न केल्याने चाहते फार नाराज झाले आहे. शाकिब ची आयपीएलमध्ये निवड का करण्यात आली नाही, हे खुद्द आता शाकिब ची पत्नी उमाने फेसबुक पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

फेसबुकवर पोस्ट करत शाकिब ची पत्नी उम्मीने म्हटलं आहे की, मी सगळ्या क्रिकेट प्रेमींना सांगु इच्छिते की, आयपीएलच्या लिलावापुर्वी आयपीएलमधील अनेक संघानी थेट संपर्क साधला होता. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात उपलब्ध होऊ शकतो की नाही. याबद्दल विचारणा करण्यात आली होती. परंतु आगामी श्रीलंका मालिकेमुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसणार असल्याने त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.

तिने पुढे म्हटले आहे की, आयपीएलच्या लिलावात खरेदी होणे ही काही मोठी गोष्ट नाही. तो शेवटही नाही. त्यासाठी पुढील वर्षे आहे. आयपीएलमध्ये निवड होण्यासाठी त्यालख श्रीलंका विरुद्धची क्रिकेट मालिका सोडावी लागली असती. मग अजून तुम्हीच म्हणालं की आयपीएलसाठी देशाचं नेतृत्व सोडलं.

आयपीएलमध्ये शाकिबने 71 सामने खेळताना 52 डावांमध्ये 124.49 च्या स्ट्राईक रेटने एकूण 793 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 63 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय शाकिबने टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 413 विकेट आणि 5851 धावा केल्या आहेत. शाकिबने वनडेमध्ये 6600 धावा आणि 277 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूने कसोटीतही चांगली कामगिरी केली आहे. या अष्टपैलू खेळाडूने 59 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 215 विकेट घेतल्या असून 4029 धावाही केल्या आहेत.