Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब? आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार

Rajya Sabha Elections | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे लोकसभेवर खासदार म्हणून गेल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज राज्यसभा निवडणुकीसाठी  अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवायच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे समजत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी 11 ते 12 जण इच्छूक आहेत. यात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar), बाबा सिद्दिकी, छगन भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेवर पाठवून थेट त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी करत होते. अशातच आता राज्यभेसाठी (Rajya Sabha Elections) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप