नवाब मलिक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय; राष्ट्रवादीचे रडगाणे झाले सुरु

मुंबई   – केंद्रातील भाजप सरकारविरोधात ठाम भूमिका आणि अनेक कारनामे उघड करणारे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे मात्र सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रातील भाजपसरकार महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जोरदार आवाज उठवला आहे.

त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक यांच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. मात्र सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही असेही क्लाईड क्रास्टो म्हणाले.