“देशाला तुझ्या मुलांची गरज”, सलमान खानच्या लग्नासाठी राखी सावंतचा नवस; चप्पलही सोडली

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रत्येक वेळी ती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे काही करते की तिच्या या कृत्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. राखीने अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचे लग्न होण्यासाठी देवाकडे नवस केला आहे.

राखी सावंत मुंबईच्या विमानतळावर विना चप्पल चालताना दिसली. राखी सावंतला अनवाणी चालताना पाहून पापाराझींनी अभिनेत्रीला विचारले की तू अनवाणी का चालत आहेस? यावर राखी म्हणाली, ‘माझा नवस आहे, मी श्रीलंका, दुबईहून चप्पलशिवाय आले आहे जेणेकरून सलमान खानचे लग्न होईल. सलमानचे लग्न होईपर्यंत मी चप्पल घालणार नाही. सलमान खान माझा भाऊ आहे. सलमान भाऊ लग्न कर, माझ्या पायाची सालटं निघाली आहेत. सलमान खान लग्न कर आणि तुला मुलं होऊ दे. या देशाला तुझी मुलं हवी आहेत.’

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स या व्हिडिओंवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.