बिग ब्रेकिंग! अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, राष्ट्रवादीला पहिला धक्का

Amol Kolhe Resigns As MP: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांसोबत जायचे की शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहायचे यावरुन द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला अजित पवार नंतर शरद पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.  हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे.

पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.दरम्यान, शरद पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.