औरंगजेब माझा आदर्श, औरंगजेबाने हिंदुस्तानावर हुकुमत केली; बीआरएस नेत्याचं वादग्रस्त विधान

मागील काही दिवसांपासून औरंगजेब (Aurangzeb) हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अहमदनगर, कोल्हापूरात काही भागात हिंसक आंदोलन झाले होते. याच आंदोलनावरून भाजपावर टीका करताना बीआरएस नेते कादीर मौलाना (Kadir Maulana) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब माझा आदर्श आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मी नक्कीच औरंगजेबाला माझा आदर्श मानतो. औरंगजेबाने हिंदुस्तानावर हुकुमत केली. अशी हुकुमत केली जेव्हा त्याचा शेवट आला तेव्हा खिशात दफन करण्याएवढेच पैसे होते. असा बादशाह मी जगात कुठेही पाहिला नाही. सध्या सगळीकडे भ्रष्टाचार आहे. इथं खायचे धंदे आहेत असं वादग्रस्त वक्तव्य कादीर मौलाना यांनी केले आहे.