‘अमोल मिटकरी म्हणजे राष्ट्रवादी पक्षात नाका पेक्षा मोती जड असे चित्र; प्रसिद्धीसाठी  थयथयाट’  

बीड – शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ED ने ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप दिले नाही, तर  विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सावध भूमिका घेत तपास यंत्रणेच काम असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र अस असताना त्यांच्या पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे मात्र केंद्र सरकार आणि राज्यात भाजपला (BJP) दोषी ठरवत थयथयाट करू लागले. पण याचा अर्थ नेतृत्वाची वेगळी भूमिका? आणि मिटकरीचा सवता सुभा अस चित्र  पाहायला मिळत आहे.

ते म्हणाले,  देशात आणि राज्यात काही घडामोडी घडल्या की राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषद आ.अमोल मिटकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राज्यातील भाजप नेतृत्वाच्या नावाने नेहमीच बोट मोडत बसत असतात. शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात ईडीन अटक केल्यानंतर या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी अगदी सावध भूमिका घेतली. दस्तुरखुद्द मा.शरदचंद्रजी पवार यांनी अद्यापही राऊत प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीत बोलायचं टाळलं? दुसऱ्या बाजूने राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवारांनी (Ajit Pawar) या प्रकरणावर दिलेली प्रतिक्रिया अत्यंत सावध आणि सूचक म्हणावी लागेल. पण अस असताना मिटकरी सारखे वाचाळ वीर केवळ प्रसिद्धीसाठी या प्रश्नावर केंद्र सरकार आणि भाजपला दोष देतात.

एक हजार कोटीचा गैरव्यवहार करत ज्यांनी गोर गरिबांची लुट केली त्याच काहीच मिटकरीना वाटत नाही. त्याहून आश्चर्य म्हणजे आपल्या नेतृत्वाची भूमिका खरंतर कार्यकर्त्यांनी मान्य करायला हवी. एकीकडे नेतृत्व काहीच बोलत नाही तर दुसरीकडे मिटकरीचा थयथयाट मात्र सुरू असताना दिसतो. याचाच अर्थ असा आहे की राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजित दादा पवार यांच्या भूमिका अमोल मिटकरी यांना मान्य नसाव्यात असा याचा अर्थ होतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षात अमोल मिटकरी नाकापेक्षा मोती जड या भूमिकेत वागत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी दिली.