‘माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईल’

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूंनी आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा केला जात आहे. यातच आता या दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना (Shiv Sena) प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असे आवाहन हिंगोली शिवसेनेचे नेते बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी केलंय.

एका मेळाव्यात बोलताना नवनिर्वाचित संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी ज्यांना जिल्हाप्रमुख पद हवं त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा त्यांचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सत्कार केला जाईल असं आवाहन करीत खळबळ उडवून दिली. दरम्यान, माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईल,अशी प्रतिक्रिया संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी दिली. यावेळी संतोष बांगर यांनी बबनराव थोरात यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

बबन थोरात याने हिंगोली, बीड, नांदेड आणि नंदुरबारच्या अनेकांकडून लाखो रुपये उकळलेत. त्यामुळे याला हिंगोलीच्या संपर्क पदावरून हटवलं होतं, हे उद्धव ठाकरे यांनासुद्धा माहिती आहे असं म्हटलं आहे.. आमच्या गाड्या तुम्ही काय फोडता, आमच्या गाड्या तुमच्या घरापुढे आणून उभ्या करतो.. स्पर्श जरी करून दाखवला तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही असे सनसनाटी वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.