Ramdas Athawale | विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा; शांती अहिंसा मानवता समता आणि विज्ञानाचा बुद्धविचार हवा

Ramdas Athawale | शांती अहिंसा समता मानवता आणि लोकशाहीच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारांची मूळ जननी असणाऱ्या बौध्द धम्माला विज्ञाननिष्ठ धम्म म्हणून जगभर स्वीकारले जात आहे. विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे याचा आम्हाला भारतीयांना अभिमान आहे. भारतात स्थापन झालेला बौध्द धम्म आता जगभर प्रसारित झाला आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) व्यक्त केले.

सारनाथ येथील मुळगंधकुटी या बुद्धविहारात आज भगवान गौतम बुद्धांच्या 2586 व्या बुद्ध जयंती निमित्त भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थि कलाशाचे रामदास आठवलेंनी दर्शन घेतले. बुद्ध जयंती निमित्त त्रिसरण पंचशील घेऊन बुद्धपुजा केली. यावेळी सर्व देशवासियांना बुद्ध जयंतीच्या रामदास आठवलेंनी शुभेछा दिल्या.

भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ज्यांना पांच भिक्खूना धम्म सांगितला तेच पाहिले धम्मचक्र प्रवर्तन ठरले. ते स्थान सारनाथ आहे. त्या पवित्र स्थळी सारनाथ मध्ये धम्मेक स्तूप उभारण्यात आला असून या धम्मेक स्तूपला बौध्द धम्म जगतात मोठे महत्वाचे पवित्र स्थान आहे. या ऐतिहासिक प्राचीन धम्मेक स्तुपला आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त रामदास आठवले यांनी भेट दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप