शिवसेनेच्या आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आ  (Shiv Sena MLA Ramesh Latke of Andheri East Assembly)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते कुटुंबासह दुबईत (Dubai) फिरायला गेले असताना काल सायंकाळी त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली.

रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल.(Ramesh Latke Passes Away )

दरम्यान, आमदार रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत सलग तीन टर्म नगरसेवक होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि काँग्रेसचे सुरेश शेट्टी (Suresh Shetty)  यांचा पराभव करुन अंधेरी पूर्व येथून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.