लवकरच ती तिथी येणार; गुलाबराव पाटलांचे अजित पवारांच्या बाबत सूचक वक्तव्य  

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत जातील अशा चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

दरम्यान, अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. मात्र त्यासाठी अजून कुळ बघावं लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असे सूचक वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.(Gulabrao Patil’s suggestive statement about Ajit Pawar)  गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दुसऱ्या बाजूला  अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत यावं असे आमंत्रण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार पक्ष सोडायची वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले. अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही असं देखील ते म्हणाले.