WTC Final नंतर अश्विन मानसिक आघातावर बोलला; म्हणाला, “माझे कुटुंबीय दुप्पट तणावात…”

Ravichandran Ashwin : ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघाला 209 धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रविचंद्रन अश्विनसारख्या (Ravi Ashwin) नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली.

यानंतर अश्विन इंडियन एक्सप्रेसशी बोलताना असे अनेक आघात आपण आणि आपल्या कुटुंबाने सहन केल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ‘माझ्या कुटुंबावर याचा किती आघात होतो हे मी पाहिले आहे. माझ्या वडिलांना ह्रदय विकार आणि इतर आरोग्याच्या तक्रारी आहेत.’

‘प्रत्येक सामना, प्रत्येक दिवस काही ना काही घडत असते. ते मला कॉल करतात ते तणावात असतात. मी बाहेर असल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या असतात. जाऊन खेळणे हे माझ्या नियंत्रणात असते. मात्र माझ्या वडिलांसाठी तसं नाहीये. मी ज्या तणावातून जातोय त्याच्या दुप्पट तणावातून ते जात असतात. त्यामुळे बाहेरच्या सर्व गोष्टी संयुक्तिकच ठरत नाहीत,’ असे अश्विनने सांगितले.