मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो; पटोलेंची सारवासारव

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे . हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मारण्याची भाषा केल्याने कॉंग्रेसवर मात्र आता टीका होऊ लागली आहे.दरम्यान, आता भाजप नेत्यांनी पटोले आणि कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता चौफेर टीका होऊ लागल्यानंतर पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे.

ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो. असं म्हणत त्यांनी सारवासारव केली आहे.