Ravindra Jadeja Family Dispute | घरातला वाद चव्हाट्यावर आल्यानंतर जडेजाचे 12 वर्षापूर्वीचे ट्विट व्हायरल

Ravindra Jadeja vs Father Controversy : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा मोठ्या वादात सापडला आहे. जडेजाच्या वडिलांनी एका मुलाखतीत मुलगा आणि सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून कोणताही होत नसून ते बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी केला आहे. एवढेच नाही तर वडिलांनी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिच्यावरही आरोप केले आहेत. आता रविंद्र जडेजाचे 2012 मधील एक ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

रविंद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) वडील अनिरूद्धसिंह जडेजा आपल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘रिवाबाने माझ्या मुलावर अशी काय जादू केली आहे माहिती नाही.’ दरम्यान, रविंद्र जडेजाचे एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविंद्र जडेजाने 12 वर्षापूर्वी ट्विट केले होते की, ‘जो रोज त्याच्या पालकांच्या पाया पडतो त्याला आयुष्यात दुसऱ्याचे पाय धरायची गरज लागत नाही.’

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा