“शाळेबाहेर तुम्हाला जे घालायचंय ते घाला पण शाळेत…”, हिजाब प्रकरणी हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली- शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे. याबाबतचे काही व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल  झाल्यानंतर आता कर्नाटकातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने पुढचे 3 दिवस माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर कथित पुरोगामी हे आता हिजाबचे समर्थन करताना दिसून येत आहेत तर अनेक विवेकवादी मंडळींनी शाळेत फक्त गणवेश घालूनच विद्यार्थ्यांनी यावे अशी मागणी केली आहे. यातच आता भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री खा. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे.

त्या म्हणाल्या की, “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.