मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्या संजय राऊतांचा माज आता मुंबईकरच उतरवेल – चित्रा वाघ

मुंबई : संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना मुंबईच दादा फक्त शिवसेना असल्याचं म्हटलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी संजय राऊत यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सर्वज्ञानी संजयजी मुंबईचा ७/१२ नावावर केलात की काय ? मुंबईकरांचं अजून किती मनोरंजन करणार आहात? मुंबईचा दादा असल्याचं तुम्हाला बोलून दाखवावं लागतयं यातचं सगळं आलयं. मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी आणि माज आत मुंबईकरच उतरवेल, अशा पद्धतीचं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेऊन हजारो लोकांच्या समोर मोठा खुलासा करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याठिकाणी केंद्र सरकारसह तपास यंत्रणांचा चेहरा उघड पाडणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. मुंबई पोलिसांनी अशा टोळ्यांविरोधात कारवाई करावी. मुंबईच दादा फक्त एकच शिवसेना अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, इडी आणि भाजप विरोधात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी भाजप आणि इडीविरोधात गंभीर आरोप केले. शिवसेना आणि इडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद हजारो लोकांच्या साक्षीने त्याठिकाणी अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितले. त्यावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत यांच्या टीका केली.