महागाई कमी करणं हे सध्या आमचं प्राधान्य नाही- सीतारामन

नवी दिल्ली – नोकऱ्यांची निर्मिती, संपत्तीचं समान वाटप, आणि आर्थिक विकास (Creation of jobs, equal distribution of wealth, and economic development) हे सध्याचे आमचे प्राधान्यक्रम आहेत, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman)  यांनी केलं आहे. महागाई गेल्या दोन महिन्यापासून कमी झाली आहे त्यामुळे सध्या तो आमचा प्राधान्यक्रम नाही, असं त्या म्हणाल्या.

द हिंदू ने ही बातमी दिली आहे.सध्या अनेक गोष्टी समोर आहेत त्यामुळे योग्य प्राधान्यक्रम ठरवणं सध्या तरी शक्य नाही. काही गोष्टी अर्थात ठरवल्या आहेत आणि काही मागे ठेवल्या आहेत, असं त्या पुढे म्हणाल्या.India Ideas Summit या भारत-अमेरिका या देशांनी आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या.