‘बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी भारताच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याच्या आधी आपली लायकी तपासावी’

Mumbai -केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. हा दौरा आणि या दौऱ्यात त्यांनी केलेलं भाषण शिवसेनेला चांगलेच झोंबले असून सातत्याने शाह यांच्यावर टीका केली जात आहे. आता अमित शाह यांच्यावर शिवसेनेनं केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

‘सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी स्वयंभू नेते असलेल्या भारताच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याच्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते,’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.