Poonam Mahajan | उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

महाराष्ट्राच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे तिकीट रद्द करून भाजपने जेष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. येथील जनतेशी माझे नाते कायम राहील, असे त्या म्हणाल्या. खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. भाजप नेत्या आणि खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

तिकीट रद्द झाल्यावर काय म्हणाल्या पूनम महाजन?
भाजपच्या नेत्या आणि मुंबई उत्तर मध्यच्या विद्यमान खासदार पूनम महाजन पुढे लिहितात, “फक्त खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणूनही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी परिसरातील कुटुंबासारख्या लोकांची नेहमीच ऋणी राहीन आणि मला आशा आहे की हे नाते कायम राहील. नेहमी टिकेल. माझे आराध्य दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला ‘आधी राष्ट्र, मग आम्ही’ हा मार्ग दाखवला, मी देवाला प्रार्थना करते की, मी आयुष्यभर तोच मार्ग अवलंबू शकेन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.” असे त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा