नवनीत राणांच्या तक्रारीची लोकसभा सचिवालयाने घेतली दखल; सरकारकडून २४ तासांत अहवाल मागवला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa reading ) करण्याचा हट्ट धरणाऱ्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती रवी राणा ( Ravi Rana ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला ( Lok Sabha Speaker Omprakash Birla ) यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हा आरोप केला आहे. दरम्यान, आता लोकसभा सचिवालयाने खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीचा अहवाल मागवला आहे. लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की,पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ( Khar Police Station ) ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची ( Scheduled Castes ) असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ ( Swearing ) केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, रविवारी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक ( Insulting behavior from Shiv Sena ) दिली जात आहे आणि माझ्याबदल खालच्या दर्जात बोललं जात आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.