शिवसेना-वंचित आघाडी युतीच्या घोषणेचे पुण्यात कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे शिवसेना व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नव्या युतीचे पेढे भरवून, उत्साहाने जोरदार स्वागत केले. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, उद्धवजी ठाकरे आगे बढो.. हम तुम्हारे साथ आहे या घोषणा कार्यकर्ते देत होते. या वेळी शिवसेना व वंचित आघाडी च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

यावेळी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, युवा सेना प्रमुख सनी गवते नितीन शेलार, मकरंद पेठकर, आकाश रेणुसे, प्रफुल्ल गुजर, अप्पा कसबे, अरविंद तायडे, विकास बेगडे, नितीन शेलार, नवनीत अहिरे, संदीप चौधरी, गौरव जाधव, सतिश रणवरे, बाबासाहेब वाघमारे, नितीन कांबळे, संजय आरवाडे, सुरेश गायकवाड, रविंद्र गायकवाड, विशाल वंजारे, माणिक लोंढे, कल्याण चौधरी या प्रमुख पदाधिकारी, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.