गोवा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा भाजपला सर्व जागांवर पाठिंबा  

मुंबई  – गोवा विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होत असून येथील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 40 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. गोवा पणजी येथे भाजप आणि आरपीआय ची संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा रामदास आठवले यांनी केली.त्यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची गोवा विधानसभा निवडणूकीबाबत भाजप आणि रिपाइं शिष्टमंडळासोबत एकत्र चर्चा झाली. यावेळी भाजप चे प्रदेश अध्यक्ष तानावडे, रिपाइं चे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब बनसोडे, रिपाइं चे गोवा प्रदेश अध्यक्ष आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्याचा विकास केला आहे.सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत आहेत. सामाजिक न्याय खाते स्वतःकडे असणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आहेत. गोव्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष एक ही जागा न लढता सर्व 40 जागांवर भाजप ला रिपाइं चा पाठिंबा राहणार आहे.गोव्यात भाजप रिपाइं चे सरकार निश्चित येईल.त्यात रिपाइं ला सत्तेचा वाटा देण्यात येईल असे आश्वासन भाजप तर्फे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत;भाजप प्रदेश अध्यक्ष तानावडे यांनी रिपाइं ला दिल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगले काम केले आहे. अनेक योजना राबविल्या आहेत.देशभरातील दलित जनता भाजप सोबत आहे.त्यामुळे 2014 मध्ये भाजप ला 284 आणि 2019 मध्ये भाजप ला 303 जागा मिळाल्या आहेत असे   रामदास आठवले यांनी सांगितले. गोव्यात ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल आप या पक्षाचे काही चालणार नाही तर भाजप आणि आरपीआय युतीचा विजय निश्चित होईल. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजप सोबत आरपीआय ची युती होण्याबाबत उत्तर प्रदेश, मणिपूर,पंजाब,उत्तराखंड आदी राज्यांत बोलणी सुरू असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.