आता काय बोलायचं! लग्न जमत नसल्याने नैराश्यातून शरद पवारांना धमकी दिली, पोलिसांची माहिती

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची (Sharad Pawar Death Threat) धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे नावाच्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, याबाबत महत्त्वाची पोलिसांनी न्यायालयाला दिल्याचे सांगितले जात आहे. नैराश्यातून सागर बर्वेने ही धमकी दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली होती. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती.

आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. आरोपी सागर बर्वेने नैराश्यातून धमकी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. लग्न होत नसल्याने आणि सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणाने सागर बर्वे नैराश्येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. तसेच सागर बर्वेने या आधीही सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा दिसून आले आहे. सागर बर्वेच्या या आधीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता तो एका विशिष्ट विचारसरणीने भारावून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, पोलिसांच्या मते त्याचे कोणत्याही संघटनेशी थेट संबंध असल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. मुंबई पोलिसांनी फेसबुक आणि ट्विटरशी संपर्क साधून आणखी माहिती मागवली आहे.