अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करा !: हुसेन दलवाई 

मुंबई – अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची रद्द करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळासह अल्पसंख्यांक विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे भेट घेतली.(Resume Pre-Matric Scholarship of Minority Students!: Hussain Dalwai)

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही शिष्यवृत्ती बंद झाल्याने गरिब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिष्यवृत्ती बंद झाल्याने शाळेत जाण्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची भिती आहे. खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळणारी शिष्यवृत्ती मिळत नाही. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी मौलाना आझाद शैक्षणिक फाऊंडेशनच्या सर्व योजना व कार्यक्रम पुन्हा सुरु करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सदर मौलाना आझाद विचार मंचचे शिष्टमंडळात माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह हसीब नदाफ, युसूफ अन्सारी, रुफी भुरे, इरफान पटेल, असिफ खान आदी पदाधिकारी होते.