अमिताभ बच्चनचा नातू अन् शाहरुख खानच्या लेकीचा भिडलाय टाका? सुहाना करतेय अगत्याला डेट

बॉलीवूडमध्ये स्टार्समधील अफेअरच्या (Bollywood Stars Affair) किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. आता या अफेअर्सच्या कहाणींमध्ये एका नव्या कहाणीची भर पडणार आहे. बॉलिवूडच्या उगवत्या स्टार्सची ही नवीन डेटिंग स्टोरी आहे. होय, सध्या ज्या बॉलीवूड किड स्टार्सबद्दल डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत, त्या म्हणजे शाहरुख खानची मुलगी (Shahrukh Khan Daughter) सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू (Amitabh Bachachan grandson) अगस्त्य नंदा यांच्या. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

‘द आर्चीज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारे अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि सुहाना खान (Suhana Khan) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू म्हणजेच श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदाही नुकत्याच कपूर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत पोहोचला होता. अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे. हिंदुस्तान टाईम्सने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, कपूर कुटुंबाच्या या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्यने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली.

अशी सुरू झाली लव्हस्टोरी
रिपोर्ट्सनुसार, अगस्त्य आणि सुहाना (Agastya Nanda & Suhana Khan Affair) यांच्या नात्याची सुरुवात झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात आणि ते त्यांचे रिलेशनशीप लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. दोघेही सध्या त्यांचे नाते अधिकृत करू इच्छित नाहीत, असे समजत आहे.

श्वेता बच्चनला सुहाना खूप आवडते!
प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित बहुतेक लोकांना त्यांच्या बाँडिंगबद्दल माहिती असल्याचेही बोलले जात आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अगस्त्याची आई श्वेता बच्चन यांनी त्यांच्या नात्याला संमती दिली आहे आणि त्यांना सुहानाही खूप आवडली आहे. मात्र, कलाकारांकडून याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.