मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून तोडगा काढावा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्यात यावं यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा बांधव उपोषण करणार आहेत. मात्र पोलिसांनी मनोज जरांगेच्या ताफ्याला आझाद मैदानावर जाण्याची परवानगी नाकारली आहे.असे असले तरीही, मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम असून ते आझाद मैदानात जाणार असल्याचे छाती ठोकून त्यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात (Azad Maidan)जाऊन बसणार आहोत. तिथे व्यासपीठ तयार आहे, त्यामुळे आंदोलन आझाद मैदानातच होणार, असा ठाम पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे.

जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार आहोत. मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार?, असा सवालही मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया