मलायका अरोरा प्रेग्नेंट? अर्जुन कपूरचं बाळ पोटात वाढतंय? जाणून घ्या सत्य

Malaika Arora Pregnancy: बॉलीवूडची ग्लॅमरस क्वीन मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे जोडपे सतत चर्चेत असते. त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशात मलायका अरोरा (Malaika Arora) गरोदर असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आता स्वत: मलायका अरोराचा प्रियकर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे अर्जुनने मलायकाच्या गरोदरपणाबद्दल सत्य सांगितले आहे.

सोशल मीडियावर सध्या मलायका अरोराच्या गरोदरपणाच्या बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये असे म्हटले गेले आहे की, अर्जुन आणि मलायका त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. ते दोघे ऑक्टोबरमध्ये लंडनला गेले होते, तेव्हा मलायकाने तिच्या जवळच्या लोकांसोबत गरोदरपणाची बातमी शेअर केली होती.

मात्र हे सत्य नसून या सर्व अफवा असल्याचे खुद्द अर्जुनने सांगितले आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून अशा अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे.

अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ही आतापर्यंतची सर्वात वाईट गोष्ट आहे आणि तुम्ही हे अगदी अनौपचारिकपणे हे केले आहे. अशा निरुपयोगी बातम्या लिहिणे अत्यंत असंवेदनशील आणि पूर्णपणे अनैतिक आहे. अशा बातम्या सातत्याने लिहिल्या जात आहेत. आपण अनेकदा या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो, पण नंतर त्या मीडियात पसरतात आणि खऱ्या ठरतात. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका.’