रिया चक्रवर्तीने मारली विशेष एनडीपीएस कोर्टात दांडी; पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार

मुंबई – दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग प्रकरणात (Sushant Singh Rajput Drugs Case) आरोपी असलेली रिया चक्रवर्ती (Riya Chakravarti) आज विशेष एनडीपीएस कोर्टासमोर (NDPS Court) हजर झाली नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने वकिलांमार्फत कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे ती आज कोर्टात हजर राहिली नाही.

आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 22 जूनला होणार आहे. ती आज जरी हजर राहिली नसली तरी पुढच्यावेळी आरोपींवरील आरोप निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे याप्रकरणातील सर्व आरोपींना पुढीलवेळी कोर्टात हजर राहावे लागेल. सुशांत सिंग ड्रग्ज प्रकरणात एकूण 35 आरोपी आहेत.

त्यापैकी 30 जामींनावर असून 5 सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.यापूर्वी रियाला 2 ते 6 जूनपर्यंत आयफा अवार्ड शोमध्ये सहभाग घेण्याकरिता न्यायालयाने परवानगी दिली होती. तरीसुद्धा ती आयफा अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाली नाही. शिवाय ती आज कोर्टात देखील हजर राहिली नाही.