रस्त्यात छेड काढताच तरुणीने रोडरोमिओला पट्ट्याने हाणला; नंतर लोकांनीही कपडे फाटेपर्यंत धुतला!

परभणी- राज्यात सर्वत्रच रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. यातून अनेक वेळा गुन्हेगारीच्या घटना घडतानाही दिसत आहेत. दरम्यान परभणीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका रोडरोमिओने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला छेडले. त्यानंतर त्याला चांगलाच चोप मिळाला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, परभणीच्या मानवत शहरामध्ये राहणारी एक मुलगी उड्डाण पूल परिसरातून घराकडे जात होती. तिथे उपस्थित शेख शकीब शेक अहमद या रोडरोमिओने मुलीची छेड काढली. त्यानंतर तरूणीने त्याला जाब विचारत चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी मुलीला नेमके काय झाले आहे अशी विचारणा केली. पीडितेने घडलेले प्रकरण नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनीदेखील ओरोपीला चांगलाच चोप दिला. यावेळी मुलीने रोडरोमिओला बेल्टने मारहाण करून त्याच्या डोक्यातील प्रेमाचे भूत उतरवले.

रोडरोमिओच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत नागरिकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मानवत पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले. या ठिकाणी हुल्लडबाजावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घडलेल्या प्रकारानंतर मुलींना घराबाहेर पाठवावे कसे असा संतप्त पालकांमधून उपस्थित केला जात आहे.