‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

Pune News: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर (Shivaji Mankar) यांनी व्यक्त केली.

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. ‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले. प्रसंगी ऍड. मंदार जोशी, अमित जाधव, ऍड. एन. डी. साबळे, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “माझा जन्म नारायण पेठेतला असून, बालपण व माझी कारकीर्द पुण्यात बहरली आहे. पुणे शहराच्या समस्यांची मला जाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात फिरत असताना शहराचा सर्वांगीण विकास कसा असायला हवा, याची अनेक आदर्श उदाहरणे पाहिली आहेत. विकासाची ही आदर्श मॉडेल्स आपण पुण्यातही राबवू शकतो. त्याचे सर्व नियोजन आपण करत आहोत. येणाऱ्या काळात पुण्यासाठी चांगले प्रकल्प, उद्योग आणण्यासाठी, तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभेत जाण्याची संधी मिळणे गरजेचे आहे.”

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार