मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार

Ram Mandir: राम मंदिर (Ram Temple) निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या  प्राणप्रतिष्ठापनेची तारीख निश्चित केली आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान होण्याची तारीख 22 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे. 22 जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला विराजमान होणार आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही राम लल्लाच्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पत्र पाठवले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांव्यतिरिक्त सुमारे 6500 मान्यवर सहभागी होणार आहेत.

या ऐतिहासिक सोहळ्याला देशातील 4000 संत-महात्मे आणि समाजातील 2500 मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सांगितले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित