संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते; संजय गायकवाड यांचा आरोप

बुलडाणा :  राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान, आता सत्तेचे सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच कामाला लागले आहेत.

या सर्व घडामोडी घडत असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आहेत. यातच आज बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील संजय राऊत यांची चांगलीच धुलाई केली. संजय राऊत यांचा समाचार घेताना ते म्हणाले, शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांवर खालच्या पातळीवर टिका केली. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो.असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही 42 आमदारांनी (MLA)संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. शिवाय संजय राऊत हे राष्ट्रवादीची(NCP) सुपारी घेऊन शिवसेना (Shiv Sena) संपवायला निघाले होते, असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला.